ट्रेंडिंग

Blog single photo

दिल्लीच्या सुरक्षेसाठी अमेरिकेकडून अत्याधुनिक मिसाईल सिस्टीम खरेदी करणार

11/02/2020

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी (हिं.स.) : भारत सरकार दिल्लीच्या सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून 'नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम -2 खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या सुरक्षा प्रणालीमुळे राजधानी दिल्ली केवळ मिसाईल हल्ल्यापासून नाही तर ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाईलपासूनही सुरक्षित राहण्यास मदत मिळेल. 


यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आपल्या तब्बल 6 हजार कोटी रुपयांच्या 'परदेशी सैन्य विक्री कार्यक्रमांतर्गत' भारताला ची विक्री करणार आहे. यासाठी अमेरिकेकडून स्वीकृती पत्राचा अंतिम मसुदा जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत भारताला मिळण्याची शक्यता आहे. हा करार झाल्यानंतर पुढच्या 4 वर्षांत अमेरिकेकडून ही सुरक्षा प्रणाली भारताकडे हस्तांतरीत केली जाईल. सुरक्षा मंत्रालयानं याआधीच साठी आवश्यक परवानगी मिळवली आहे. त्यानंतर भारताकडून अमेरिकेला औपचारिकरित्या पत्र पाठवण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी भारत दौ-यात या कराराला मूर्त स्वरूप येण्याची शक्यता आहे. 
हिंदुस्थान समाचार 
Top