अंतरराष्ट्रीय

Blog single photo

रश्मी सामंतची ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी निवड

14/02/2021

लंडन, १४ फेब्रुवारी, (हिं.स.) : भारतीय वंशाची रश्मी सामंतची ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. हे पद मिळविणारी रश्मी सामंत ही पहिली भारतीय महिला आहे. रश्मी सामंत विद्यापीठाच्या लिनॅक्रे कॉलेजमधून ऊर्जा प्रणाली या विषयावर एमएससी करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या निवडणुकीत रश्मीने 3,708 मतांपैकी 1,966 मते मिळवून भव्य विजय मिळविला.
रश्मीच्या टीममध्ये आणखी काही भारतीय असून यामध्ये देविका उपाध्यक्ष ग्रॅज्युएट्स इलेक्ट आणि धिती गोयल स्टुडंट ट्रस्टीज इलेक्ट पदावर निवडली गेली आहे.
रश्मीने मणिपाल आणि उडुपी येथे तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले असून ती एमआयटी, मणिपालमध्ये विद्यार्थी परिषदेची तांत्रिक सचिव देखील होती.
हिंदुस्थान समाचार


 
Top