अपराध

Blog single photo

सचिन वाझेंच्या कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ

25/03/2021

25/03/2021मुंबई, २५ मार्च (हिं.स.) : सचिन वाझे यांच्या कोठडीत एनआयएच्या विशेष न्यायालयाने ३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी एनआयएकडून कसून तपास सुरू आहे.

सचिन वाझेंना यापूर्वी एनआयएने १४ मार्च रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. आज वाझेंची कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वाझेंच्या कोठडीत नऊ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

एनआयएने केलेला युक्तिवाद

यावेळी एनआयएने कोर्टाला आज अत्यंत धक्कादायक माहिती दिली. वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून ३० जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. ३० पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र २५ काडतुसे गायब आहेत. ही २५ काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचे एनआयएने सांगितले. वाझे तपासात सहकार्य करत नाहीत. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून चौकशी करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली. त्याशिवाय वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा अहवाल यायचा बाकी आहे. वाझेंच्या गाडीतून मिळालेले पुरावे, आवाजाचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आवाजाचे नमुने फॉरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांमधील नमुने घेण्यात आले आहेत. शिवाय आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आरोपीने १२ लाख रूपये दिले होते. त्याचीही माहिती घ्यायची असल्याचा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आला.


हिंदुस्थान समाचार


 
Top