ट्रेंडिंग

Blog single photo

पाकिस्तानात विमान कोसळून 98 जण मृत्यूमुखी

22/05/2020

कराची, 22 मे (हिं.स.) : पाकिस्तानातील कराची येथे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे विमान कोसळून झालेल्या अपघातात 98 जण ठार झाल्याची माहिती पुढे आलीय. हे विमान लाहोरहून कराचीकडे येत होते. कराची शहराच्या नागरीभागात झालेल्या या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. 


कराची विमानतळानजीकच्या नागरीवस्तीत हे विमान कोसळले असून या अपघातानंतर स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले. या अपघातातील जीवितहानीचा नेमका आकडा कळू शकलेला नाही. हे विमान घरांवर कोसळल्यानंतर स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर परिसरात प्रचंड धूर दिसू लागला. या अपघातात सुमारे 10 ते 12 घरांचे नुकसान झाले आहे. 

हिंदुस्थान समाचार


 
Top