अपराध

Blog single photo

पुणे : बलात्कार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरी

13/02/2020

पुणे, 13 फेब्रुवारी (हिं.स) : चिमुकलीला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या 55 वर्षीय नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश ए.यु. मालवणकर यांनी सुनावली. दंडापैकी पाच हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. 


सुरेश गोविंद झांबरे (वय 55) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पीडित 8 वर्षे 4 महिन्यांच्या चिमुकलीच्या आईने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. 16 मे 2016 रोजी ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलगी, प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली.
हिंदुस्थान समाचार


 
Top