अंतरराष्ट्रीय

Blog single photo

सौदी अरेबियाने 20 देशांची हवाई वाहतूक केली स्थगित

03/02/2021

नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी, (हिं.स) : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सौदी अरेबियाने २० देशांची हवाई वाहतूक स्थगित केली आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
संयुक्त अरब अमिरात, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, इजिप्त, लेबनॉन आणि भारत या देशांचा यात समावेश आहे.

 दरम्यान सौदी अरेबियाने डिसेंबर महिन्यात परदेशात जाणारी उड्डाणे थांबविली होती. मात्र जानेवारी मध्ये ही स्थगिती त्यांनी उठवली होती. आता पुन्हा एकदा २० देशांमधील विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. 

हिंदुस्थान समाचार


 
Top