चेन्नई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : तामिलनाडूतील विरुधुनगरमध्ये शुक्रवारी एका फटाक्यांच्या फॅक्ट्रीला भीषण आग लागली. या दूर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून या अपघातात प्रभावित झालेल्यांसाठी नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 2 लाख रुपये. तर गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये देयण्याची घोषणा करण्यात आली आहे.