महाराष्ट्रात 59 हजार 907 नवे रुग्ण, 322 जणांचा मृत्यू
07/04/2021
मुंबई, 07 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्रात आज दिवसभरात तब्बल 59 हजार 907 नवे कोरोनाग्रस्त आढळून आलेत. तर 322 रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत 60 हजाराच्या घरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 30 हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्याही आता 5 लाखाच्या वर गेलीय. राज्यात सध्या 5 लाख 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 31 लाख 73 हजार 261 झाली आहे. त्यातील 26 लाख 13 हजार 627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 56 हजार 652 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हिंदुस्थान समाचार