खेल

Blog single photo

16 व्या टिम टॉपर्स स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

03/02/2020

अहमदनगर, 3 फेब्रुवारी (हिं.स.):- नगर शहरांमध्ये गेल्या वीस वर्षापासून क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या टीम टॉपर्सच्या वतीने आयोजित केलेल्या १६व्या टीम टॉपर्स स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पाटोळे म्हणाले की, अहमदनगर शहरांमध्ये गेल्या वीस वर्षांपासून क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती करणाऱ्या टीम टॉपरचे विद्यार्थी आजपर्यंत अनेक सामन्यांमध्ये चमकलेले आहेत.नुकत्याच नागपूरमध्ये घोषित केलेल्या क्रिडा जगातील बहुमान असलेल्या राष्ट्रीय राज्य आव्हाड करिता संपूर्ण महाराष्ट्रातून ५४३ खेळाडू आले होते.त्यामध्ये २० खेळाडूंची निवड केलेली आहे. त्यामध्ये टीम टॉपरचे राष्ट्रीय रत्न अवॉर्ड पुरस्कार प्राप्त खेळाडू खालील प्रमाणे गौरव सुनील डहाळे,आवेज शेख,वाहिद अब्दुल,चैतन्य गुंदेचा,आदिश दाभाडे,पारस निकम,ओंकार राऊत यांची निवड झाली आहे.आम्ही जास्तीत जास्त खेळाडू घडवू असे ही म्हणाले.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, आजची लहान मुले तरुण वर्ग मैदानी खेळापेक्षा इतर मनोरंजनाच्या बाबीकडे आकर्षित झालेले दिसते.त्यामुळे मुलांना मैदानाकडे वळवण्याचा प्रयत्न करावा लागेल.त्यामुळे तरुण वर्ग देखील या क्षेत्रात पुढे आला पाहिजे.आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा फक्त शैक्षणिक विकास घडून चालत नाही तर शारीरिक विकास देखील साधला गेला पाहिजे.याकरिता टीम टॉपर्स नेहमी प्रयत्नशील असते असे म्हणाले.
हिंदुस्थान समाचार  


 
Top