मनोरंजन

Blog single photo

हिंदी भाषेचे संवर्धन हे आपले कर्तव्य- कंगना राणावत

10/01/2020

मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.) :  हिंदी एक उत्तम भाषा असून तिचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेय. 10 जानेवारी हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने कंगना हिने आपले विचार व्यक्त केलेत. 

हिंदी दिवसाचे निमित्त साधत पंगा चित्रपटाच्या चमूने अभिनेत्री कंगना राणावत यांचा विशेष व्हिडीओ प्रदर्शित केला. यावेळी हिंदी भाषेचे महत्व सांगताना कंगना म्हणाल्या की, हिंदी एक उत्तम भाषा असून तिला जपणे नागरिकांचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने इंग्रजी येणे आणि न येणे हे एक सामाजिक परिमाण झाले असून चित्रपट सृष्टीतील अनेकांनी मला यामुळे पाण्यात पहिले. परंतु मी त्यांच्यात राहूनच हिंदी भाषेचा सन्मान वाढविला. कंगना पुढे म्हणाल्या की, भारतीय भाषांमध्ये जी मजा आहे ती इंग्रजीत नाही. 

पंगा चित्रपट कब्बडी खेळाशी संबंधित असून फॉक्स स्टार स्टुडिओच्या अंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटात जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता, रिचा चड्ढा, जस्सी गिल आणि कंगना राणावत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केले आहे. चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होईल. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top