राष्ट्रीय

Blog single photo

केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

09/10/2019

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर (हिं.स.) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून कर्मचा-यांना 1 जुलै पासून ही वाढ लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.


 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज, बुधवारी झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यातील वाढीसोबतच इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची चांगली भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्याचा निर्णयाला बैठकीत मंजूरी दिली. या निर्णयामुळे 50 लाख वेतनधारक कर्मचारी आणि 62 पेन्शनधारकाना लाभ होणार आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर तब्बल 16 हजार कोटी रूपयांचा बोजा पडणार असून, चालू आर्थिक वर्षाच्या 1 जुलैपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. त्यात पाच टक्के वाढ करण्यात आल्यामुळे डीए17 टक्के झाला आहे, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top