खेल

Blog single photo

नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटूंची विशेष कामगिरी

06/03/2020

ठाणे, ०६ मार्च, (हिं.स) : नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटू यांनी विशेष कामगिरी करीत पदके पटकाविली. 12 वर्षाखालील गटात बॅकस्ट्रोक या प्रकारात ईदांत चतुर्वेदी याने सुवर्णपदक प्राप्त केले. तर 10 वर्षाखालील गटात बॅकस्ट्रोक या प्रकारात ‍ विहान चतुर्वेदी याने सुवर्णपदक, फ्री स्टाईल प्रकारात रौप्यपदक, तर 100 मीटरच्या फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले. तर, ‍आदित्य घाग याने 50 मीटरच्या व 100 मीटर या दोन्ही स्पर्धेत फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. तर परीन पाटील याने 50 मीटरच्या बटरफ्लाय या प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. आठ वर्षाखालील गटात विराट ठक्कर याने बॅकस्ट्रोक या प्रकारात सुवर्णपदक तर फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले.
हिंदुस्थान समाचार


 
Top