क्षेत्रीय

Blog single photo

चंद्रपूर : जिप्सी चालक व गाईडला ताडोबात प्रवेशबंदी

13/02/2020


चंद्रपूर 13 फेब्रुवारी (हिं.स.)
राज्यात प्रख्यात असणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पांढरपवनी जवळ व्याघ्र दर्शनाचा थरार रंगला होता.या प्रकरणी ताडोबा व्यवस्थापनाने जिप्सी चालक व गाईडला व्याघ्र प्रकल्प प्रवेशबंदी केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याकडून मागितला असून त्यानुसार अहवाल आल्यानंतर दोषी आढळल्यास पुढील कारवाईचे संकेत आहेत. 

राज्यात पर्यटनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रख्यात आहे. त्यामुळेच पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेटी देतात.व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगलातील एका वेगळ्याच दुनियेची ते सफर करतात. रविवारी जिप्सी मध्ये बसून सकाळच्या सत्रात पर्यटक सफारीसाठी गेले असता अचानक ताडोबातील पांढरीपवनी जवळील पहिल्या चौकात प्रख्यात मटकासूर समोर आला. वाघाने वाट अडवली आणि जिवाच्या भीतीने काळजाचा थरकाप उडाला.
याप्रकरणी जिप्सी चालक व गाईडला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांनी मागितला आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल असे सूत्रांनी स्पष्ट केले.जिप्सी चालक व गाईडचा सफारी बाबतचा पूर्वइतिहास देखील अभ्यासला जाईल व त्यानुसार अहवाल आल्यानंतर दोषी आढळल्यास पुढील कारवाईचे संकेत आहेत. 
हिंदुस्तान समाचार
 
Top