क्षेत्रीय

Blog single photo

खरे हीरो ! आरोग्य कर्मचारी २४ तास कार्यरत

24/03/2020

चंद्रपूर २४ मार्च (हिं.स.) : जिल्हा प्रशासनाने सक्त पाऊले उचलली असून करोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसला तरी ग्रामीण व शहरी भागात खबरदारी म्हणून आरोग्य कर्मचारी २४ तास कार्यरत आहे. हेच खरे हीरो ठरत असून आरोग्य कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत.

 जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये व लगेच प्रतिबंध घालता यावा यासाठी प्रत्येक घरोघरी जाऊन आशा सोबत सर्व अंगणवाडी सेविका मार्फत सोमवारपासून सर्वे सुरू आहे. या सर्वेमध्ये परदेशातून तसेच बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व व्यक्तींचे नाव व मोबाईल नंबर यासह इतर सर्व माहितीची नोंद घेतली जात आहे.
जिल्ह्यामध्ये तसेच तालुकास्तरीय कोरोना नियंत्रण कक्ष व संपर्क दूरध्वनी क्रमांक जारी केले आहे. यामार्फत मुंबई, पुणे व इतर बाधित जिल्ह्यातून आलेले सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व इतर व्यक्ती यांना दिवसातून एकदा दूरध्वनीद्वारे संपर्क करीत असून त्यामार्फत संबंधित सर्व २४ तास घरामध्ये १४ दिवस राहणे अनिवार्य आहे असे सांगण्यात येत आहे. 

जे नागरिक विदेशातून जिल्ह्यात आलेले आहेत त्या सर्वांना एक दिवसात दोन भेटी व दोनदा दूरध्वनीद्वारे संपर्क आरोग्य विभागाच्या पथकामार्फत करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत निर्देश दिलेले सर्व विदेशातून आलेले व्यक्ती २४ तास होम कॉरेन्टाईन होत आहे की नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी अशा व्यक्तींना सकाळी आरोग्य विभागाच्या पथकामार्फत आणि सायंकाळी पोलीस विभागामार्फत गृहभेट दिली जात आहे. जर ताप, कोरडा खोकला, जिभ व गळा खसखस करणे, सर्दी असल्यास अशा व्यक्तीला वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. चंद्रपूर शहरात फॉरेस्ट अकॅडमी वसंत विहार येथे कॉरेन्टाईन करण्यात येत आहे. हेच खरे हीरो ठरत असून आरोग्य कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत. 


हिंदुस्थान समाचार



 
Top