अपराध

Blog single photo

डोंबिवली स्कायवॉकवर अपघात

12/02/2020

डोंबिवली, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी अतिक्रमणक
केले असताना दुसरीकडे मात्र स्कायवॉकववरून एक इसम बुधवारी सकाळी सहा वाजता पडला.
मात्र
 स्कायवॉकखालील
केबलच्या सह्याने लटकून खाली पडला. त्यामुळे सुदैवाने हा इसम बचावला. हे दृश्य
पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.सकाळी मुंबईला
कामावर जाण्यासाठी डोंबिवली
 स्कायवॉकवर प्रवाश्यांची प्रचंड
गर्दी असते. बुधवारी सकाळी एक इसम अचानक
 स्कायवॉकवर पडल्याने
प्रवाश्यांनी आरडा-ओरड केली. सदर इसमाने स्कायवॉकच्या खाली असलेल्या केबलच्या आधार
घेत खाली उतरला. हे सर्व पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. स्कायवॉकववरून
पडलेला इसम मद्यधुंद अस्वस्थेत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. सदर घटना
घडल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी आले नाही. स्कायवॉकवर फेरीवाले हटवले नसल्याने
होणाऱ्या गर्दीमुळे हा प्रकार घडला असावा अशी चर्चा आहे.हिंदुस्थान समाचार


 
Top