अपराध

Blog single photo

अहिरांच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

26/09/2019

 चंद्रपूर, 26 सप्टेंबर (हिं.स.) भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील वाहनाला आज, गुरुवारी जाम नजिक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अहिर थोडक्यात बचावले असून अपघातग्रस्त वाहनातील अंगरक्षक मनोज झाडे आणि फलजीभाई पटेल यांचे उपचारादरम्यान निधन झाले. 


 केद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कमांडंट सुभाष चंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार
हसंराज अहीर आज, गुरुवारी सकाळी चंद्रपूरहून दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. नागपूर विमानतळावर जात असताना जाम गावाजवळ एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या ताफ्यातील स्कॉर्पिओ गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात अहिर यांच्या ताफ्यातील स्कॉर्पिओ गाडीचे (एम.एच. 20 इइ. 1039) मोठे नुकसान झाले. तसेच अपघातामुळे गाडीत बसलेले सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झालेत. 

 या अपघातात थोडक्यात बचावलेल्या अहिर यांनी तत्काळ रूग्णवाहिकेची व्यवस्था केली. तसेच अपघातात गंभीर जखमी झालेले विजयकुमार, फलजीभी पटेल, मनोज झाडे, एम.डी. साजिद, जयदीपकुमार, प्रकाशभी आणि बनवारीलाल रेगट यांना उपचारासाठी नागपुरातील ऑरेंज सिंटी रूग्णालयात हवले. याठिकाणी उपचारादरम्यान मनोज झाडे आणि फलजीभाई पटेल यांचे निधन झाले. तर इतर तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते.
हिंदुस्थान समाचार


 
Top