अपराध

Blog single photo

नालासोपारा पोलिस ठाण्यात झाली हत्या

14/10/2019


- मेव्हण्याने केले जावयावर चाकूचे वार 


मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.) मुंबईतील नालासोपारा येथे भर दिवास मेव्हण्याने आपल्या जावयाची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. विशेष म्हणजे विवाहीतेच्या कथित आत्महत्या प्रकरणी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले असताना हा भयानक प्रकार घडला आहे. 

 यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार मृतक आकाश कोल्हेकर हा रिक्षाचालक असून तो नालासोपारा येथील धनंजय नाका परिसरातील मातृछाया इमारतीत वास्तव्यास होता. रविवारी 13 ऑक्टोबर रोजी आकाशची पत्नी कोमल कोल्हेकर (वय 20) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमलच्या मृत्यूच्या कारणांची पोलिस चौकशी करीत आहेत. दरम्यान सातारा येथील कोमलचे नातेवाईक तिच्या अंत्यसंस्कारासाठी सोमवारी (14 ऑक्टोबर रोजी) मुंबईला आले. कोमलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुमाराला पोलिसांनी आकाश कोल्हेंकर याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. यावेळी मृतक कोमलचा भाऊ रविंद्र काळे देखील उपस्थित होता.
पोलिस ठाण्यात आकाशची चौकशी सुरू असतानाच रविंद्र काळे यांने आपल्या जवळील चाकूने आकाशवर हल्ला चढवला. या प्राणघातक हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला होता. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी रविंद्रला अटक केली. तर जखमी आकाशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान आकाशचा मृत्यू झाला. आकाशच्या मृत्यूनंतर रवींद्रच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. दरम्यान पोलिस ठाण्यात झाल्येल्या या हत्येमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होतेय. 
हिंदुस्थान समाचार


 
Top