अपराध

Blog single photo

पित्यानेच केला स्वतः च्या अल्पवयीन लेकिचाच विनयभंग

13/02/2020

वर्धा, १३ फेब्रुवारी (हिंस) : एका प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून जाळुन मारण्याचे प्रकारणाची धग कायम असतांनाच शहरात एका नराधम पित्याने स्वतः च्या अल्पवयीन लेकिचाच विनयभंग केल्याची तक्रार खुद्द मुलीनेच हिंगणघाट पोलिसांत केली आहे.
तीन बायकांच्या दादला असलेल्या या पित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

 सदर प्रकार शहरातील सावित्रीबाई फुले कन्या वसतिगृह येथे घडला असून आरोपी पिता आपल्या शिक्षणाकरिता येथे वास्तव्यास असलेल्या १३ वर्षीय मुलीची भेट घेण्याकरीता आला असता सदर निंदनीय प्रकार केला.
आरोपी पिता हा पत्नी व कुटुंबियापासून विभक्त झाला असून सध्या तो मध्य प्रदेशातील जबलपुर येथे वास्तव्यास आहे.
काही 
वर्षांपूर्वी पीड़िता तिच्या आईसह जबलपुर येथे राहायची, परंतु नंतर तीची आई सोडून गेल्यामुळे रालेगांव (यवतमाळ)
तालुक्यातील कोपरी येथे राहत होती. शिक्षणाकरीता ती हिंगणघाट येथे वस्तीगृहात राहत होती. तो मुलीस भेटण्याकरीता वस्तीगृहात गेला.
 तिला वसतिगृहातुन बाहेर बोलावून कामांध नजरेने तिच्याशी छेड़छाड़ करु लागला असता ती तेथून ताबड़तोब वासतिगृहात आली. तिने नकार दिल्याने प्रवेशद्वाराजवळच तिला अर्वाच्च शिविगाळ करीत विनयभंग केला.
तिने आपल्या वार्डनकड़े याची माहिती दिली. त्यानंतर वार्डनचे मदतीने तिने पोलिस तक्रार केली. त्याला पोलिसांनी राळेगांव तालुक्यातील कोपरी येथून पोलिसांनी ताब्यात घेवून जेरबंद केले. पोलिसांनी भादवी ३५४ अ व पोस्कोनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयीन पोलिस कोठडी 
सुनावण्यात आली आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top