ट्रेंडिंग

Blog single photo

नागपूर : हायकोर्टाने फेटाळली नितीन गडकरींच्या विरोधातील याचिका

11/02/2020

नागपूर, 11 फेब्रुवारी (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपने नागपूर मतदारसंघात मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड करून नितीन गडकरी यांना अधिकाधिक मतदान होईल, अशी व्यवस्था केल्याचा आरोप करत निवडणुकीला आव्हान देणारी याचिका बसप नेते मनोहर डबरासे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. परंतु, याचिकार्ता पुरावे सादर न करू शकल्यामुळे हायकोर्टाने सदर याचिका फेटाळून लावली.


डबरासे यांच्या याचिकेनुसार, लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातील इव्हीएममध्ये भाजपनं तांत्रिक बिघाड करून अधिकाधिक मते गडकरी यांनाच मिळतील अशी सोय केली होती. त्यामुळं इतर उमेदवारांना मिळालेली मतं केवळ गडकरी यांनाच मिळाली, असा आरोप करण्यात आला. तसंच मतमोजणीत देखील तफावत आढळून आली असल्याचा दावा करण्यात आला. परंतु, नितीन गडकरी यांनी याचिकेतील आरोप फेटाळले. तसेच डबरासे यांच्या याचिकेवर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 117 अन्वये हरकत घेऊन, सबळ पुरावे दाखल करण्याची मागणी केली. परंतु याचिकाकर्त्याला पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळं हायकोर्टाने डबरासे यांची याचिका फेटाळून लावली. 
हिंदुस्थान समाचार 
Top