मनोरंजन

Blog single photo

धमाकेदार पुनरागमनासाठी अल्लू अर्जुन सज्ज

11/01/2020

हैदराबाद, 11 जानेवारी (हिं.स.) : जवळपास 647 दिवसानंतर स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन पुन्हा एकदा सुपेरी पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करण्यास सज्ज आहे. अभिनेते अल्लू अर्जुन यांच्या बहुप्रतीक्षित  'अला वैकुंठ पुरमलो  ' हा  चित्रपट  रविवार 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.   चित्रपटातील सर्व गाण्यांना रसिकांनी डोक्यावर घेतले असून सामाजिक माध्यमांवर सर्व विक्रम तोडीत नवीन विक्रम प्रस्तापित केला आहे.अल्लू अर्जुन यांच्या केरळमधील चाहत्यांची संख्या बघता अला वैकुंठ पुरमलो  मल्याळम भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. 

अल्लू अर्जुन आणि  दिग्दर्शक त्रीविक्रम श्रीनिवास यांची जोडी तिसऱ्यांदा प्रेक्षकांना घायाळ करणार आहे. साहित्य आणि लेखनासाठी प्रसिद्ध असलेले त्रीविक्रम यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिगदर्शन केले आहे.चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच संगीत दिगदर्शक  एस. एस थमन यांच्या गाण्यांमुळे चित्रपटाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. संगीताबरोबर अल्लू अर्जुन यांचे नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. चित्रपटाचे स्वागत करण्यासाठी जागोजागी अल्लू अर्जुन यांचे मोठं मोठाले पोस्टर, चित्र लागले आहेत.

 'अला वैकुंठ पुरमलो  ' या चित्रपटातील 'सामाजवर गमना ' ह्या गाण्याने  यु-ट्यूब  घायाळ केले. युवा गायक सिड श्रीराम यांनी हे गाणे म्हटले आहे तरजेष्ठ  साहित्यिक सीताराम शास्त्री यांनी शब्दबद्ध  केले आहे.90 च्या काळात अनेक आघाडीच्या तेलुगू अभिनेत्यांसोबत काम केल्या नंतर तब्बल दहा वर्षांनी अभिनेत्री तब्बू  यांनी  'अला वैकुंठ पुरमलो’   या चित्रपटातून पुन्हा एकदा तेलुगू चित्रपटांकडे पुनरागमन केले आहे.  तब्बू या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री पूजा हेगडे आणि अल्लू अर्जुन दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. यापूर्वी त्यांनी " डीजे " चित्रपटात काम केले होते. 

'अला वैकुंठ पुरमलो  ' चित्रपटात अल्लू अर्जुन, अभिनेत्री तब्बू, पूजा हेगडे यांच्या शिवाय निवेथा पेथुराज, सुमंथ, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, जयराज प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सोमवार 5 जानेवारी रोजी चित्रपटाचा प्रदर्शनपूर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यावेळी चित्रपटातील सर्व गाण्यांवर विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला  आणि ट्रेलर सुद्धा यावेळी प्रदर्शित केले. 

हिंदुस्थान समाचार


 
Top