क्षेत्रीय

Blog single photo

अकोला: लिंबूला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने उपटून फेकली बाग

02/06/2020

अकोला, 02 जून (हिं.स.)  : अकोला जिल्ह्यातील  लिंबू उत्पादक शेतक-यांना लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसला आहे. लिंबाला बाजारात किंमत मिळत नसल्याने अकोला जिल्ह्यातील बाभूळगावातील शेतकरी विजय कराळे यांनी 3 एकरातील लिंबाची बाग जेसीबीच्या सहाय्याने उपटून टाकली .

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लावण्यात आलेल्या  लॉकडाऊनमुळे उन्हाळ्यात लिंबू शरबताची दुकाने, रसवती, हॉटेल व बाजारपेठ बंद असल्याने लिंबाची मागणी कमी होऊन भाव कोसळले. लाखोचे पीक कवडीमोल भावात गेले.
लिंबू उत्पादक शेतकरी यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. अकोल्यातील बाभूळगाव येथील विजय कराळे या शेतकऱ्याची तीन एकरात लिंबूची बाग आहे. लिंबाला 10 ते 15 रुपये किलो दराने देखील कुणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे  लिंबू तोडणीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. तर आतापर्यंत लिंबु पिकाला मोठा खर्च केला मात्र तोही या शेतकऱ्यांचा निघाला नाही अखेर या शेतकऱ्याने आपल्या तीन एकरातील लिंबू बाग जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकली. दरम्यान या शेतकऱ्याने सरकार कडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
हिंदुस्थान समाचार
 
Top