अंतरराष्ट्रीय

Blog single photo

चीनमध्ये करोनामुळे आतापर्यंत 490 जणांचे मृत्यू

06/02/2020

बीजिंग, 06 फेब्रुवारी (हिं.स.) : चीनमध्ये करोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या 24 हजार 324 झाली आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे 490 हून अधिक लोकांचे मृत्यू झाल्याची माहिती चीनच्या आरोग्य विभागातील अधिका-याने दिली.


 चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार चीन मधील 31 प्रांतांमध्ये आतापर्यंत एकूण 24 हजार 324 जणांना करोना विषाणुचा प्रादुर्भाव झालाय. चीनच्या हुबेई या प्रांतात मंगळवारी करोनाचे 65 रुग्ण नोंदविण्यात आले; तसेच करोनाचे नवे 31 रुग्ण नोंदविण्यात आले. दरम्यान, 431 करोनाग्रस्त रुग्ण गंभीर असून, 262 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 892 झाली आहे आणि संशयीत रुग्णांची संख्या 1 लाख 85 हजार इतकी आहे. 
 हिंदुस्थान समाचार 
Top