ट्रेंडिंग

Blog single photo

महाराष्ट्रात मध्यरात्रीपासून १४४ कलम लागू - मुख्यमंत्री

22/03/2020

मुंबई, २२ मार्च, (हिं.स) : कोरोना
व्हायरसचा प्रभाव पाहता सर्वात कठीण काळ सुरु झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व
नागरी भागात १४४ कलम लागू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
जाहीर केले. आज त्यांनी जनतेबरोबर संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, आपण आता अधिक पुढची पावले
टाकत आहोत. जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा
आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा. 
पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नका, असे
आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पुढे ते म्हणाले की,  आम्ही रेल्वे, खासगी बस आणि एस टी सेवा बंद
करीत आहोत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु
ठेवण्यात येणार आहे. अन्न धान्य
, भाजीपाला, औषधे दुकाने, बँका, वित्तीय संस्था सुरू राहणार आहे.
शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.  तसेच मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी
विमाने बंद होणार आहेत. ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहे त्यांच्या हातावर शिक्के
आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नये आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे
राहण्यास सांगावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच कर्मचा-यांचे हाल न करता
त्यांना किमान वेतन दिले जावे असेही त्यांनी सांगितले आहे.हिंदुस्थान समाचार


 
Top