अपराध

Blog single photo

प्रकाश नेमीनाथ लाटे यांच्या खूनप्रकरणी १३ आरोपींना जन्मठेप

18/03/2020

सोलापूर 18 मार्च (हिं.स)

मिर्झनपूर (ता. बार्शी) येथील प्रकाश नेमीनाथ लाटे यांच्या खूनप्रकरणी १३ आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ३० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी ठोठावली. 

वहिवाटीच्या, शेतात कुळविण्याच्या कारणावरून एक एप्रिल २०१६ रोजी मिर्झनपूर येथे ही घटना घडली होती. समाधान वसंत घोळवे, विजय आण्णा लाटे, राजेंद्र मगर नागरगोजे, दशरथ मगर नागरगोजे, रामकृष्ण आण्णा लाटे, छगन आबास लाटे, अक्षय राजेंद्र नागरगोजे, प्रवीण राजेंद्र नागरगोजे, सुनीता राजेंद्र नागरगोजे, सुनीता दशरथ नागरगोजे, उषा समाधान घोळवे, निर्मला विजय लाटे, वसंत राजाराम घोळवे (सर्व रा. मिर्झनपूर) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रकाश लाटे हे मिर्झनपूर येथे शेतात कुळवत होते. त्यांच्या आई काशीबाई व वडील नेमीनाथ यांच्यासमोरच त्यांना जबर मारहाण झाली होती.
हिंदुस्थान समाचार 
 
Top