क्षेत्रीय

Blog single photo

गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ चंद्रपुरात राकॉंची निदर्शने

13/02/2020

चंद्रपूर 13 फेब्रुवारी (हिं.स.) -
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४५ रुपयांची विक्रमी दरवाढी झाल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी निदर्शने करण्यात आली.

'बहोत हुई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार', मोदी तेरे राज मे, कटोरा आया हात मे’ गॅस दरवाढ कमी करा अश्या मोदी सरकार विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके,जिल्हा उपाध्यक्ष ज्योती रंगारी यांच्यासह वंदना आवळे, चारुशीला बरसागडे, शोभा घरडे, हर्षा खैरकर, लता जांभूळकर व अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 
हिंदुस्तान समाचार 
Top