अपराध

Blog single photo

अकोला-दुचाक्या चोरणारी टोळी गजाआड; लाखोंच्या दुचाक्या जप्त

25/03/2021

अकोला, 25 मार्च(हिं.स.) मोटर सायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफ़ाश झाला आहे.या टोळीतील तिघांना गजाआड करण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या तिन्ही चोरटयांना जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. रोहित पंडित निदाने, सय्यद रोशन सय्यद कादिर व सय्यद आझाद उर्फ सय्यद बबलू कादिर असे या चोरट्यांची नावे आहे. त्यांच्याकडून चोरीच्या जवळपास १७ मोटर सायकाली या चोरट्यांकडून जप्त करण्यात आले आहे.. त्यांनी अकोला, बुलडाणा, नांदुरा, जळगावसह अन्य भागातून जिल्ह्यातून मोटर सायकली पळवले होते. तसेच त्यांच्याकडून आणखी चोरीच्या मोटर सायकल मिळणार असल्याची शक्यता आहेय. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.
हिंदुस्थान समाचार 
Top