ट्रेंडिंग

Blog single photo

मध्यप्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता

23/03/2020

भोपाळ, 23 मार्च (हिं.स.) : मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडींनंतर सोमवारी 23 मार्च रोजी पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी रात्री 9 वाजता राजभवनात जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

 तत्पूर्वी, शिवराजसिंह चौहान यांना सोमवारी भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीत पर्यवेक्षक बनवण्यात आलेले भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मध्यप्रदेशात 18 महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी 22 आमदारांसह पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अल्पमतात आले होते. परिणामी गेल्या आठवड्यात बहुमत सिद्ध करण्यापूर्वी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा दिला होता. 
 हिंदुस्थान समाचार 
Top