अपराध

Blog single photo

नांदेड : माहूर येथे एसटी बसमध्ये वाहकाची गळफास घेवून आत्महत्या

26/02/2021

नांदेड, 26 फेब्रुवारी, (हिं.स.) : तिकीट मशीनमध्ये बिघाड आल्याने चुकीचे तिकीट दिल्या गेले आणि नेमके तेच तिकीट तपासणी पथकाच्या हाती लागले. चार वर्षे प्रामाणिकपणे सेवा देवूनही आपल्यावर कार्यवाहीत होईल. यामुळे नातेवाईकांमध्ये बदनामी होईल या भीती पोटी माहूर एस.टी.आगारातील वाहक संजय संभाजी जानकर (55 )रा.वाघी जि.नांदेड यांनी शुक्रवार 26 फेब्रु.रोजी स.4 वा. आगाराच्या आवारात उभ्या असलेल्या एस.टी.(क्र.एम एच- 20 बीएल -4015)मध्ये गळ्याला फास घेवून जीवन यात्रा संपविली. 

जानकर हे माहूर -नांदेड फेरीवर असताना त्यांनी महागांवच्या प्रवाशांकडून पैसे पूर्ण घेतले. मात्र, तिकीट धनोड्या पर्यंतचेच दिल्याची बाब तपासणी पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाली. त्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. पोलीसांनी पंचनामा केला असून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविले आहे. मृत जानकर यांच्या खिशात चिट्ठी सापडली असल्याची माहिती आगार प्रमुख व्ही.टी.धुतमल यांनी दिली. नादुरुस्त तिकीट मशीन संजय जानकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याची बाब त्यांनी लिहून ठेवलेल्या चार पानी पत्रातून उघड झाली असून त्यांच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
तिकीट तपासणी पथकाने धनोडा गावाजवळ बस तपासून तिकीट अपहाराचा आरोप लावला. या आरोपावर जानकर यांनी सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. आपण प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे. तिकीट मशीन नादुरूस्त असल्याने 3 फुल एक हाफ असे लिहून दिले. सदर मशीन खराब होण्याची प्रिंट न येण्याची तक्रार वारंवार कंडक्टर करत असतात. मी कितीही सांगितले तरी मलाच दोषी ठरवण्यात येणार आहे. मात्र, तांत्रिक दोष असलेल्या एसटी प्रशासनाला आपल्या आत्महत्येप्रकरणी दोषी ठरवावे असे त्यांनी जबाबात लिहून ठेवले आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top