खेल

Blog single photo

नामांकित ग्रँडमास्टर खेळाडूं मार्फत नगरच्या खेळाडूंना मार्गदर्शन देणार

01/10/2019

अहमदनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.):- नगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय बुध्दीबळ प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन उद्योजक तथा संघट नेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व ग्रॅण्डमास्टर स्वप्निल धोपाडे यांच्या हस्ते झाले

.या शिबीराला जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंचा प्रतिसाद लाभला.यावेळी संघटनेचे सचिव यशवंत बापट,खजिनदार सुबोध ठोंबरे,विश्‍वस्त पारूनाथ ढोक ळे,डॉ.अण्णासाहेब गागरे,ग्रॅण्डमास्टर शार्दुल गागरे,डब्ल्यू.आय.एम.शाल्मली गागरे,फिडे मास्टर सुयोग वाघ,अखिलेश नगरे,सुमंगल गागरे आदींसह खेळाडू,पालक व बुद्धिबळ प्रेमी उपस्थित होते. या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीरात ग्रॅण्ड मास्टर स्वप्निल धोपाडे खेळाडूंना वेळेचे नियोजन,खेळाडूंवर येणारा दबाव,विविध चाली, प्रत्यक्ष पटावर खेळताना काही टिप्स,खेळाची सुरुवात व शेवट अशा महत्त्वाच्या गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत.
हिंदुस्थान समाचार


 
Top