अंतरराष्ट्रीय

Blog single photo

भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची अमेरिकेतील नासाच्या कार्यवाहक पदी नियुक्ती

02/02/2021

नवी दिल्ली, २ फेब्रुवारी, (हिं.स)  :  भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची अमेरिकेतील नासा अंतराळ संस्थेच्या कार्यवाहक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी याबाबतची घोषणा केली. 


भव्या यांना अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा चांगला अनुभव आहे, असे नासाने निवेदनात नमूद केले आहे. लाल यांनी नासाच्या इनोव्हेटिव्ह अॅडव्हान्स्ड कॉन्सेप्ट्स प्रोग्राम आणि नासा अ‍ॅडव्हायझरी कौन्सिलच्या तंत्रज्ञान, नाविन्य आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या बाह्य परिषदेचे सदस्य पद देखील भूषवले आहे.

 हिंदुस्थान समाचार


 
Top