अपराध

Blog single photo

भंडारा : पुलावर दुचाकी अनियंत्रित होवुन दोन तरुणांचा मृत्यू

10/02/2021

भंडारा, 10 फेब्रुवारी (हिं.स.)   : भंडारा जिल्याच्या तुमसर तालुक्यातुन जाणाऱ्या बपेरा मार्गावरील खैरलांजी गावाच्या नाल्यावर मंगळवारी रात्री  सुमारास दुचाकी अनियंत्रीत होऊन पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात दोन तरूण मृत्यूमुखी पडले. समीर राऊत आणि संगीत चौधरी अशी या तरुणांची नावे असून ते दोघे नागपूरहून आपल्या गावी परत जात होते. 
यासंदर्भातील माहितीनुसार समीर आणि संगीत दोघेही मंगळवारी  संध्याकाळी नागपूरहून गावी जाण्यासाठी निघाले होते. परंतु, बुधवारी सकाळपर्यंत ते  घरी न पोचल्याने दोघांना घरच्या लोकांनी फोन केला मात्र दोघांचे मोबाईल बंद असल्याने त्यांचा पता लागला नव्हता मात्र मोबाईल लोकेशनवरुन दोन्ही तरुणाचा सोध घेतला असता खैरलांजी गावाच्या नाल्याजवळ दोघांच्या मोबाईलचे लोकेशन मिळाले. त्याआधारे  शोध घेतला असता नाल्याखाली दोघांचे मृतदेह आणि दुचाकी मिळाल्याने अपघाताची माहिती मिळाली. याप्ररणी  पोलिसांनी  घटनेचा पंचनामा करून दोन्मृही तदेह शवविछेदना करिता पाठवीलेत.
हिंदुस्थान समाचार 


 
Top