अंतरराष्ट्रीय

Blog single photo

पाकव्याप्त काश्मिरात पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज

22/10/2019

मुझफ्फराबाद, २२ ऑक्टोबर (हिं.स.) पाकव्याप्त काश्मिरातील मुझफ्फराबाद येथे स्वातंत्र्यांची मागणी करणे स्थानिक रहिवाशांना खूप महागात पडले आहे. स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी आयोजित शांततामय मोर्चावर पाकिस्तानी पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. यामध्ये दोन नागरिक मृत्यूमुखी पडले असून ८० जण गंभीर जखमी आहेत.

पाकिस्तानी फौजांनी १९४७ साली आजच्याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. या ७२ व्या घुसखोरी दिनाचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून नागरीक मोठया संख्येने रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांना पाकिस्तान सरकारविरोधात निदर्शने करण्यापासून रोखण्यात आले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पाकिस्तान पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या व लाठीचार्ज केला. पीओके आणि गिलगीट, बालटिस्तानमधील जनता २२ ऑक्टोंबर रोजी काळा दिवस पाळते. पाकिस्तानने आपल्या प्रदेशातून निघून जावे अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान पाकिस्तान पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघाले आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top