अपराध

Blog single photo

चंद्रपूर : घुग्घुस येथे ३० लाखांच्या खंडणीसाठी हत्या, आरोपीला अटक

13/02/2021

चंद्रपूर,13 फेब्रुवारी (हिं.स.) : तब्बल ३० लाख
रुपयांसाठी अपहरण केलेल्या घुग्घुस येथील तरुण अभियंता शुभम फुटणे याची हत्या
केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला
अटक केली असून शुभमचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.  घुग्घुस येथून १७ जानेवारी २०२१ रोजी शुभम फुटाणे (२५) या युवकाचे अपहरण
करण्यात आले होते. मित्राला भेटण्यासाठी शुभम घराबाहेर पडला होता. त्यानंतर त्याचे
अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी शुभमच्या घरी फोन करून ३० लाख रुपयांची
रक्कम मागितली होती. दुसऱ्याच दिवशी घुग्घुस येथील डॉ.दास यांच्या घराजवळ शुभमची
मोटरसायकल आढळली होती. या घटनेनंतर. स्थानिक गुन्हे शाख व घुग्घुस पोलिसांनी
सूत्रे वेगाने फिरवली. मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी पकडलेल्या गणेश
पिंपळशेंडेला तपासणीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर गणेश पिंपळशेंडेने शुभमच्या
हत्येचा खुलासा केला आहे. गुन्ह्याची कबुली दिल्यावर गणेश पिंपळशेंडेला अटक
करण्यात आहेहिंदुस्थान समाचार


 
Top