इंडोनेशियात पूर आणि भूस्खलनामुळे १०० जणांचा मृत्यू
06/04/2021
लेंबाटा, ७ एप्रिल, (हिं.स) : पूर्व इंडोनेशियात आणि शेजारील तिमोर लेस्ट परिसरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात मृत्यू पावलेल्यांची संख्या १०० वर पोहोचली आहे. तर ६२ हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.
येथील भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे आपात्कालीन यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. सद्य स्थितीत भूस्खलन आणि पुराचा फटका बसलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे.