नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत लातूरच्या रंगकर्मीचा झाला गौरव
लातूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत लातूरच्या रंगकर्मीचा गौरव झाला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबईतर्फे आयोजित ''नाट्य परिषद करंडक २०१५'' या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या लातूर केंद
नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत लातूरच्या रंगकर्मीचा झाला गौरव


लातूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत लातूरच्या रंगकर्मीचा गौरव झाला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबईतर्फे आयोजित 'नाट्य परिषद करंडक २०१५' या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या लातूर केंद्रावरील प्राथमिक फेरीत सहभाग घेतलेल्या संघांचा तसेच पारितोषिक विजेत्या संघ आणि रंगकर्मीचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हॉटेल पंचवटी येथे रंगलेल्या या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन व स्वागत गीताने वातावरण भारावले. लातूर केंद्राच्या प्राथमिक फेरीत विविध महाविद्यालये, संस्था व स्वसंघांनी सहभाग नोंदवला होता. नाट्यलेखन,दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना आदी सर्व क्षेत्रांतील गुणवंत रंगकमौंचा सन्मान करून नाट्य परिषदेने स्थानिक रंगभूमीला प्रेरणादयी ऊर्जा दिली. या वेळी प्रमुख पाहुणे सुनील बर्वे यांनी आपल्या भाषणात नाटक ही फक्त कला नाही तर जीवन जगण्याची शाळा आहे. एकांकिका स्पर्धा म्हणजेच नवोदितांना मिळणारे पहिले व्यासपीठ आणि आत्मविश्वासाचे आरसे आहे. असे प्रतिपादन केले, कार्यक्रमास विविध सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, रंगकर्मी व रसिक प्रेक्षक उपस्थित होते. परिषदेच्या या उपक्रमामुळे लातूरच्या रंगभूमीला नवचैतन्य लाभल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande