धुळ्यात भाजप आ.अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नातून तीन कोंटीचे गार्डन उभारणार
धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) | धुळे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे पांझरा नदीकाठावरील तिसर्‍या पुलालगत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ हे गार्डन उभारण्यात येणार असून, ही योजना आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारत आहे. आ. अग्रवाल या
धुळ्यात भाजप आ.अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नातून तीन कोंटीचे गार्डन उभारणार


धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) | धुळे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे पांझरा नदीकाठावरील तिसर्‍या पुलालगत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ हे गार्डन उभारण्यात येणार असून, ही योजना आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारत आहे. आ. अग्रवाल यांच्या पाठपुराव्यानंतर या गार्डनसाठी राज्य शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

आमदार अग्रवाल यांनी या जागेची पाहणी करून अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या पाहणीवेळी आर्किटेक्ट आनंद खैरनार, महापालिकेचे अभियंता चंद्रकांत उगले, एन. के. बागूल, अभियंता प्रणव शिंदे, राकेश कुलेवार आदी उपस्थित होते. आ. अग्रवाल यांनी शहराच्या सवारगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत.

यामध्ये रावेर परिसरातील नवीन औद्योगिक वसाहत, श्रीराम सृष्टी, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, टॉवर गार्डन, संत रोहिदास गार्डन, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, पाचकंदील परिसरातील चारही मार्केटचे आधुनिकीकरण, संत सावता माळी मार्केटची उभारणी, महिलांसाठी मॉल, भाजीपाला विक्रेत्यांसाठी शेड, सौरऊर्जेवरील बटर फ्लाय, दीपस्तंभ, व्यापारी संकुल, केंद्र आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विकासकामांचा समावेश आहे. या सर्व कामांमुळे शहरात सौंदर्य आणि सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे.नवीन भारतरत्न गार्डनफ हे धुळेकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande