कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीत वाहतूक मार्गात बदल
रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) : कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीत विठ्ठल मंदिर देवस्थान येथे कार्तिकी एकादशी उत्सव पार पडणार आहे. त्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. उत्सवादरम्यान 2 नोव्हेंबर रोजी पहाटे १२ ते ३ नोव्हेंबर रो
कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीत वाहतूक मार्गात बदल


रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) : कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीत विठ्ठल मंदिर देवस्थान येथे कार्तिकी एकादशी उत्सव पार पडणार आहे. त्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

उत्सवादरम्यान 2 नोव्हेंबर रोजी पहाटे १२ ते ३ नोव्हेंबर रोजी १० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची रामनाका ते गाडीतळ आणि गोखले नाका ते कॉंग्रेस भवन येथील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या वाहतुकीला आठवडा बाजार-टिळक आळी-शेरे नाका-गाडीतळ हा पर्यायी मार्ग सुरू ठेवण्यात येणार आहे.

कार्तिकी एकादशी उत्सव कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून त्याकरिता सुमारे १२ हजार भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्याकरिता पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

हे वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व मंत्री यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने, पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने यांना लागू होणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande