
लातूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे उपस्थित होते
खासदार डॉक्टर शिवाजी काळगेनिलंगा येथे काँग्रेस पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुक्याच्या पदाधिकारी आढावा बैठकीस उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर पालिका,नगर परिषद,नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. तसेच जिंकणार असल्याचे खासदार काळगे यांनी सांगितले. या आढावा बैठकीस पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख,जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे,मल्लिकार्जुन मानकरी, श्रीशैल्य उटगे,.डॉ. अरविंद भातांब्रे, विजयकुमार पाटील, अजित बेलकुंदे, आबासाहेब पाटील,अजित नाईकवाडे, जयश्रीताई पाटील, तानाजी निडवंचे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis