
नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये झालेल्या अनियमितता, मनमानी कारभार आणि निधीच्या अपव्ययाबाबत एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांनी विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
डॉ. ठाकूर म्हणाले की, केंद्र सरकारकडून देशातील शंभर शहरांप्रमाणे नाशिकलाही स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ८५७.५० कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातून सुमारे एक हजार कोटी रुपयांचे २१ प्रकल्प हाती घेण्यात आले. मात्र, त्यांपैकी बहुतांश कामे निष्कृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पंचवटीतील रामकाल पथाच्या कामात भुयारी गटारीच्या चुकीच्या बांधकामामुळे प्रशासनाला तब्बल १२ कोटींचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे उदाहरण देत ठाकूर म्हणाले की, या सर्व गैरव्यवहारामुळे शहराचे नुकसानझाले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प हे नाशिककरांसाठी 'स्मार्ट' न राहता 'अपयशी प्रकल्प' ठरले आहेत. इलेक्ट्रिक स्मशानभूमी,याप्रसंगी माजी नगरसेवक पोपटराव हगवणे, सिद्धार्थ गांगुर्डे, ज्ञानेश्वर चव्हाण, सुभाष पाईकराव, राजेंद्र बनसोडे, दशरथ साळवे, गणेश घोडेराव, अजित खान, उमेश दासवानी, सुहास गांगुर्डे, रंजित परदेशी, उमेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV