
परभणी, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथील श्री अंबिका माता मंदिर परिसरात दीपस्तंभ प्रतिष्ठान तर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध आजारांवरील तपासण्या व सल्लामसलत करण्यात आल्या.
शिबिरामध्ये मोतीबिंदू, मुतखडा, मणक्यावरील विकार, कान-नाक-घसा आजार, हाडांचे फ्रॅक्चर, हृदयरोग, कॅन्सर, किडनी, डोळे तपासणी, अन्नप्रक्रिया समस्या, अपेंडिक्स आदी आजारांवर वैद्यकीय तपासणी व निदान करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, भाजपा नेत्या प्रेरणा वरपूडकर, डॉ. केदार खटिंग, सरपंच दगडूआप्पा काळदाते, तरोडा सरपंच मुरलीधर शेळके, डॉ. दैवत लाटे, सुंदर महाजन ब्राह्मणगावकर यांची उपस्थिती लाभली. या शिबिराचे आयोजन दिलीप काळदाते यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच ब्राह्मणगावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून गावात आरोग्य जागृती निर्माण करण्याचा दीपस्तंभ प्रतिष्ठानचा प्रयत्न स्थानिकांकडून कौतुकास्पद ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis