शिरपूर तालुका पोलिसांनी गावठी कट्टयासह दोघांना पकडले
धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) | मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पुणे येथुन मोटरसायकलीने आलेल्या दोन तरुणांना शिरपूर तालुका पोलिसांनी शिताफीने पकडून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुससह ७७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल
शिरपूर तालुका पोलिसांनी गावठी कट्टयासह दोघांना पकडले


धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) | मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पुणे येथुन मोटरसायकलीने आलेल्या दोन तरुणांना शिरपूर तालुका पोलिसांनी शिताफीने पकडून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुससह ७७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील आंबा लालमाती रस्त्यावर पुणे येथील दोन तरुण एका मोटरसायकलीने गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन जात असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती.

त्या अनुषंगाने पोलिसांनी पथक तयार करून सापळा लावून पल्सर कंपनीची मोटरसायकल (एमएच १६/ डीएन- ५००२) ने जाणार्‍या दोघांना पकडले. प्रकाश लक्ष्मण राठोड (२३) रा. नन्हे रोड कृष्णाई मंगल कार्यालय जवळ, पुणे, साहिल युनुस शेख (२०) रा.वारजे, डॉ. आंबेडकर चौक पुणे, अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, २ हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुस व ५० हजार रुपये किमतीची मोटार सायकल असा एकूण ७७ हजार रुपये किमतीचा मध्मान हस्तगत करण्यात आला आहे याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande