
नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने आणि मित्र विहार स्पोर्टस् क्लब यांच्या सहकार्याने मित्र विहार स्पोर्टस् क्लब, मेहेर सिग्नल, एम.जी रोड येथील क्रीडांगणावर मंगळवार दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२५ रोजी वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महिलांच्या जिल्हा संघ निवड चांचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता निवड चाचणीला प्रारंभ होईल. या निवड चाचणीतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्हा संघासाठी निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक १३ ते १६ नोव्हेंबर, २०२५ दरम्यान इस्लामपूर, जिल्हा सांगली येथे आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातर्फे सहभागी होतील. या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्हयातील जास्तीत जास्त संस्थेच्या खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवहान नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी रामदास होते मो. ९९२२३३०६०२ आनंद खरे मो. ७०८४०५३२२१ यांच्याशी संपर्क साधावा. या निवड चाचणीसाठी राष्ट्रीय खेळाडू राजेन्द्र शिंत्रे, हिरामण वाघचौरे आणि सहकारी प्रयत्नशील आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV