नाशिक : झाडावर ट्रक आदळल्याने चालकाचा मृत्यू
नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : कुत्रा आडवा गेल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना आयशर ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना उपनगर नाका येथे घडली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ झाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्ह
नाशिक : झाडावर ट्रक आदळल्याने चालकाचा मृत्यू


नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : कुत्रा आडवा गेल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना आयशर ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना उपनगर नाका येथे घडली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ झाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की शंकरभाई लालाभाई मालीवाड (वय ५४, रा. दाहोद, गुजरात) हे जीजे ०६ बीव्ही ००१६ या क्रमांकाच्या आयशर ट्रकचे चालक आहेत. मालीवाड हे सकाळी ९ वाजेच्या सुमारास पुण्याहून नाशिकच्या दिशेने ट्रकमध्ये माल भरून घेऊन येत होते. नाशिकरोड येथे उपनगर नाक्याजवळ त्यांच्या ट्रकला कुत्रा आडवा गेल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व हा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या कडुलिंबाच्या झाडावर जाऊन आदळला. त्यात चालक शंकरभाई मालीवाड यांना गंभीर दुखापत झाल्याने ते ठार झाले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोरफड करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande