उत्तर महाराष्ट्रात जिंदाल समूह गुंतवणूक करण्यास इच्छुक : सोनवणे
नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : जिंदाल स्टेनलेस स्टील समूहाचे मुख्य व्यवसाय अधिकारी शशीभूषण उपाध्याय व विक्री व मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष विशाल शेठ यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार उत्तर महाराष्ट्रात उद्योगांच्या उपलब्ध संधीनुसार जिंदाल समूह गुंत
उत्तर महाराष्ट्रात जिंदाल समूह गुंतवणूक करण्यास इच्छुक : सोनवणे


नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : जिंदाल स्टेनलेस स्टील समूहाचे मुख्य व्यवसाय अधिकारी शशीभूषण उपाध्याय व विक्री व मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष विशाल शेठ यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार उत्तर महाराष्ट्रात उद्योगांच्या उपलब्ध संधीनुसार जिंदाल समूह गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी उत्तर महाराष्ट्रात असलेल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ या संदर्भात विस्तृत माहिती सादर करण्यात केली. यावेळी झालेल्या चर्चेत जिंदाल समूह हा रायगड जिल्ह्यात ४५ हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक करणार असल्याचे उपाध्याय यांनी नमूद केले. न तसेच महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी उत्तर महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या मुबलक जागा, कुशल मनुष्यबळ, पाणी, वीज, उद्योगाला पोषक पायाभूत सुविधा या संदर्भात माहिती दिली. तसेच प्रस्तावित निफाड ड्रायपोर्ट, वाढवण बंदर, समृद्धी महामार्गद्वारे उपलब्ध आयात निर्यातीच्या संधी याचे सादरीकरण केले. कृषी व ग्रामविकास समितीचे चेअरमन राजाराम सांगळे यांनी जिंदाल समूहाद्वारे कृषी क्षेत्रात येऊ घातलेल्या नवीन उद्योग कृषीपूरक उद्योगात असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील पोषक वातावरण व शेतीमालास योग्य मोबदला मिळण्यासाठी असलेल्या निर्यात संधी याविषयी सादरीकरण केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande