धुळे, कुटंणखान्याचा भंडाफोड ठाण्याच्या महिलांची सुटका
धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील देवपूर परिसरात पोलिसांनी अनैतिक देहविक्री व्यवसाय करणार्‍या टोळीवर कारवाई करत एकास अटक केली आहे. घटनास्थळी आक्षेपार्ह साधने,तीन मोबाईल हँडसेट आणि पाच हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.या ठिकाणी ठाणे व मुंब
धुळे, कुटंणखान्याचा भंडाफोड ठाण्याच्या महिलांची सुटका


धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील देवपूर परिसरात पोलिसांनी अनैतिक देहविक्री व्यवसाय करणार्‍या टोळीवर कारवाई करत एकास अटक केली आहे. घटनास्थळी आक्षेपार्ह साधने,तीन मोबाईल हँडसेट आणि पाच हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.या ठिकाणी ठाणे व मुंबई येथील दोन पीडित महिलाही आढळल्या. पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री एक वाजेला गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि लगेचच फरार झालेल्या संशयिताचा पथकाने शोध सुरू केला.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेजस जैन (रा. स्वामीनारायण कॉलनी, नटराज टॉकीजजवळ, धुळे) व राहुल पुंडलिक पाटील (वय १९) रा. जी.टी.बी. कॉलनी, देवपूर, धुळे) अशी संशयितांची नावे आहेत. या दोन्ही संशयितांनी संगनमत करून स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांचा गैरफायदा घेत बॉडी मसाजच्या नावाखाली अनैतिक देहविक्री व्यवसाय सुरू केला होता. असा आरोप आहे.यासाठी खास अंधेरी पश्चिम (मुंबई), (डोंबिवली पूर्व, जि. ठाणे) येथील दोन महिलांना ठेवण्यात आले होते. या दोन्ही महिलांसह इतर महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहविक्री करण्यास प्रवृत्त केले असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या संशयास्पद घरातून रोख पाच हजार रुपये,रोख ,विवो व रिअलमी कंपनीचे दोन आणि एक अन्य कंपनीचा मोबाईल हँडसेट अन्य आक्षेपार्ह साधन,साहित्य हस्तगत केले.संशयित राहुल पाटील हा पोलिसांना तेथेच सापडला.त्याला ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य संशयित तेजस जैन मात्र फरार झाला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कायदा, कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली आहे.या कारवाईमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande