रेणापूर विविध विकास कामासाठी ८ कोटी २९ लक्ष रुपयाचा निधी मंजूर
लातूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल ८ कोटी २९ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या पंधरवाड्यातच १० कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शाहरातील २१ विकासकामे होणार
रेणापूर विविध विकास कामासाठी  ८ कोटी २९ लक्ष रुपयाचा निधी मंजूर


लातूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल ८ कोटी २९ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या पंधरवाड्यातच १० कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शाहरातील २१ विकासकामे होणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदाररमेश कराड यांच्या पाठपुराव्यामुळे विकास कामांना निधी मिळत आहे. यापूर्वी इनडोर क्रीडा संकुल, प्रशासकीय इमारत, पाणीपुरवठा योजना, श्री रेणुका देवी मंदिर भक्तनिवास, बालाजी मंदिर परिसरात भव्य सभागृह, रेणा नदीवर घाट बांधकाम,

अशोक सम्राट बौद्ध विहार, मुस्लिम बांधवांसाठी शाईखाना, विविधसमाजांची समाज मंदिरे, अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, पथदिवे, वाचनालय विकसित करणे यासह विविध कामासाठी कोटधावधी रुपयाचा निधी आ. रमेशआप्पा कराड यांनी मंजूर करून आणला. विविध मंजूर झालेल्या कामापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे येत्या काळात सुरू होणार आहे पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्सव महाअभियान योजनेतून ३ कोटी १९ लक्ष ६९ हजार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेतून १ कोटी ४७ लक्ष २७ हजार, नागरी दलितेतर बस्ती सुधार योजनेतून ३ कोटी ३५ लक्ष ५५ हजार असे एकूण ८ कोटी २१ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.

मंजूर निधीतून विविध प्रभागात सिमेंट रस्ते, नाली बांधकामासह नाला बांधकाम, दलित बस्ती स्मशानभूमी बांधकाम, नरसिंह मंदिर सभागृह बांधकाम, नरहरी मंदिर सभागृह बांधकाम, महादेव मंदिर सभागृह बांधकाम, नरसिंह मंदिर बांधकाम असे एकूण २९ कामांना मान्यता मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande