
कार्तिकी एकादशीनिमित्त एसटी महामंडळातर्फे व्यवस्थालातूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। लातूरमधून पंढरपूर साठी थेट जादा बस धावणार आहेत कार्तिकी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाची तयारी सुरू करण्यात आली आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे दोन नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून १,१५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. लातूरमधील पाचही आगारांतून तब्बल ४५ जादा बस पंढरपूर मार्गावर धावणार आहेत. गर्दी वाढली तर जादा बसच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी यात्रा बुधवारपासून (ता. २९) ७ नोव्हेंबरपर्यंत भरणार असून यात्रेचा मुख्य दिवस कार्तिक शुक्ल एकादशी, रविवार (ता. २) आहे. पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या चंद्रभागा या यात्रा बसस्थानकावरून कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक होणार आहे. यात लातूरमधील ४५ बसचा समावेश आहे. यात्रेनिमित्त मागील वर्षी ३० जादा बस सोडण्यात आल्या होत्या. यंदा ४५ बस सोडल्या जाणार आहेत. यात लातूर आगारातून १३, उदगीर ८, अहमदपूर ६, निलंगा ६, औसा आगारातून १२ जादा बस धावणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis