राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये सोमवारी वकिली बंद
नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून वकिलांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. काही ठिकाणी या हल्ल्यांमध्ये वकिलांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल तातडीने मंजूर करावे, या मागणीसाठी बार कौन
राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये सोमवारी वकिली बंद


नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून वकिलांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. काही ठिकाणी या हल्ल्यांमध्ये वकिलांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल तातडीने मंजूर करावे, या मागणीसाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी राज्यभरातील वकिलांना ३ नोव्हेंबर रोजी न्यायालयीन कामकाजातून अलिप्त राहण्याचे आवाहन केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात नुकताच एका वकिलावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेने वकिलवर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सभेत वकिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले त्वरित उचलावीत आणि 'अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल' मंजूर करावे, या मागणीसह ठराव पारित करण्यात आला. त्याचबरोबर ३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व न्यायालये, खंडपीठे आणि जिल्हास्तरीय न्यायालयांमध्ये वकिली बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वकिलांच्या संरक्षणासाठी कायदेशीर तरतूद व्हावी, अन्यथा आंदोलनाची दिशा अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा बार कौन्सिलने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande