माजी महापौर, उपमहापौरांसह १५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव , 1 नोव्हेंबर (हिं.स.) आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. भारतीय जनता पक्ष, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्रि
माजी महापौर, उपमहापौरांसह १५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश


जळगाव , 1 नोव्हेंबर (हिं.स.) आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. भारतीय जनता पक्ष, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीत उतरतील, अशी घोषणा करत महाजन यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, “महायुती या वेळी रेकॉर्डब्रेक जागा जिंकून सत्ता स्थापन करणार. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याच वेळी उद्धव सेनेतील १५ माजी नगरसेवक व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाला बळकटी देत मोठा राजकीय धक्का उद्धव सेनेला दिला. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला हा प्रवेश सोहळा महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाला भाजप खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रवेश सोहळ्यात माजी महापौर नितीन लड्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन, जयश्री महाजन, नितीन बरडे, प्रशांत नाईक, वर्षा खडके, शबाना खाटिक, चेतन शिरसाळे, राजू अडवाणी, हर्षा सांगोरे, संगीता दांडेकर, जाकीर पठाण, इक्बाल पिरजादे, प्रदीप श्रीश्रीमाळ, रिटा सपकाळे, फिरोज पठाण, संदेश भोईटे, हेमलता नाईक, जितेंद्र मुंदडा आणि नितीन सपके या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रवेशामुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली असून, उद्धव सेनेला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा धक्का बसला आहे. जयश्री महाजन, नितीन लड्ढा, सुनील महाजन यांसारख्या अनुभवी नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे, तर भाजपचा मनोबलही उंचावला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande