
परभणी, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।
नवा मोंढा पोलिस ठाण्यासह अन्य पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोपेडसह मोबाईल व महिलांच्या पर्स लंपास केल्याबद्दल दोघा विधीसंघर्ष बालकांना नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन निरीक्षणगृहात रवाना केले.
नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पारदेश्वर महादेव मंदिराचे देवदर्शनकरीता निघालेल्या एका मुलीसह तीच्या आईस दोन अनोळखी मोटरसायकलस्वारांनी त्यांचे मागे मागे येवून त्यांचे समांतर मोटरसायकल आणुन पर्स हिसकावून पोबारा केला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघा विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले. तेव्हा त्या दोघांनी नवा मोंढा पोलिस ठाणे हद्दीत व शहरामध्ये इतर ठिकाणी निर्जन ठिकाणांवरुन चालणार्या महिलांची पर्स हिसकावून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी या विधीसंघर्ष बालकांकडून एक रेडमी कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल किंमत 2000, एक रेडमी कंपनीचा पांढर्या रंगाचा मोबाईल किंमत 4000, एक नथिंग कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल किंमत 45000, रोख 2500रुपये त्यामध्ये 500रुपये दराच्या 05 नोटा, एक हिरो स्प्लेंडर प्लस काळया रंगाची दुचाकी (एमएच 22 वीजी 7781) किंमत 20,000, एक निळया रंगाची होन्डा अॅक्टीवा मोपेड (एमएच 22 बीडी 9544) किंमत 60,000 असा एकूण 1,33,500 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.
या प्रकरणी दोन्ही विधीसंघर्ष बालकांविरुध्द पोलीस स्टेशन नवा मोंढा येथे गुन्हा नोंद आहे. या विधीसंघर्ष बालकांना बालन्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी निरीक्षण गृहात करण्यात आली आहे.
या प्रकरणी नानलपेठचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सुरवाडे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत नारमोड, राहुल गोला, संतोष सानप, अंबादास चव्हाण, शोएब पठाण, विठ्ठल हेडे, जवादे, सुमेध पुंडगे, सुधाकर शिंदे, चालक कालिदास देशपांडे, चालक दवणे यांनी काम पाहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis